न्यायालयावर आरोप करणाऱ्या 'त्या' न्यायमूर्तींची होणार हकालपट्टी ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |


नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या मोठ्या खटल्यांवर सुनावणी करण्यासाठी पाच न्यायाधीशांचे एक नवे खंडपीठ तयार करण्यात येणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेल्या त्या चार न्यायाधीशांना या खंडपीठामध्ये यापुढे सामील करून घेण्यात येणार नसल्याचे सर्वो.न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नवे खंडपीठ हे सरन्यायाधीशांच्याच अध्यक्षतते खाली असणार असून त्यासाठी न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असे देखील ते म्हणाले आहे.

विशेष सीबीआय न्यायाधीश म्हणून काम पाहत असलेल्या बी.एच.लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीसंबंधी, समलैंगिक संबंध, शबरीमला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यासंबंधी तसेच पारसी महिलांचा इतर धार्मिक पुरुषांशी विवाह संबंधी न्यायालयात असलेल्या काही म्हत्त्वाच्या प्रकरणावर हे नवे खंडपीठ सुनावणी करणार आहे. तसेच न्यायालयासमोर येणारे इतरही अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांवर देखील हे नवे खंडपीठच सुनावणी करेल, असे देखील मिश्रा यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान जस्टिस जे चेलामेश्वर, रंजन गोगोई, एम बी लोकुर आणि कुरियन जोसेफ यांच्या संबंधी काय निर्णय घेण्यात आला आहे, याविषयी मात्र अद्याप कसल्याही प्रकारचे स्पष्टीकरण न्यायालयाकडून किंवा मिश्रा यांच्याकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे चारही न्यायाधीशांचे मागील अधिकार काढून घेणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मिश्रा यांनी सर्व चार न्यायाधीशांसह न्यायपालिकेतील सर्व न्यायाधीश आणि वकिलांची भेट घेऊन त्यांच्यासमोर हा स्पष्ट केलेला आहे.
@@AUTHORINFO_V1@@