अफगाण नागरिकांकडून ट्रम्प यांना 'शौर्य पदक'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |




काबुल : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान संबंधी गेल्या काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यासाठी अफगाणिस्तानमधील नागरिकांनी लोकवर्गणीतून ट्रम्प यांना 'शौर्य पदक' देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी वृत्तीवर अत्यंत जोरदार आणि योग्य प्रहार केला असून अमेरिकेचे ते आतापर्यंतचे सर्वात धाडसी नेते असल्याचे देखील या नागरिकांनी म्हटले आहे.

काबुलच्या दक्षिणेला असलेल्या लोगार या या गावातील नागरिकांनी ट्रम्प यांना हे शौर्य पदक देण्याचे ठरवले आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि दहशतवादाविरोधात कडक भूमिका घेऊन अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. त्यामुळे गावातील सर्व नागरिकांनी लोक वर्गणीतून १५ ग्रॅम सोन्याचे शौर्य पदक तयार केले असून त्याची किमत ४५ हजार अफगाणी म्हणजे ६४५ डॉलर्स एवढी आहे, अशी माहिती या गावातील नागरिक फरहाद अखबरी यांनी दिली आहे. तसेच या संबंधी अफगाणिस्तानमधील अमेरिकन राजदुतांशी देखील चर्चा झाली असून अमेरिकेचे राजदूत जॉन बास यांनी हे शौर्यपदक ट्रम्प यांना देऊ, असे आश्वासन देखील दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ट्रम्प यांनी गेल्या १ तारखेला पाकिस्तानला दहशतवादावरून खडेबोल सुनावत, यापुढे अमेरिकेकडून देण्यात येणारी सैनिकी आर्थिक मदत रोखण्याचा निर्णय घेतला होता. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली होती. तसेच अमेरिकेच्या या निर्णयाला अनेक देशांनी देखील आपला पाठींबा दिला होता. विशेषतः अफगाणिस्तानने अमेरिकेच्या या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले होते.
@@AUTHORINFO_V1@@