१ जुलै २०१८ पासून आधार फेस ऑथेंटिकेशन लाँच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |
 

 
 
नवी दिल्ली : आधार वापरकर्त्यांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) आज चेहरा ओळख-आधारावर आधारित प्रमाणीकरण लाँच होणार असल्याची घोषणा केली. विशेषत: ज्यांना बोटाचे ठसे किंवा आयरीससारख्या बायोमेट्रिक पडताळणीसाठी समस्या येत असतील त्यांच्यासाठी हे महत्वाचे ठरणार आहे.
 
चेहरा ओळख-आधारावर (फेस ऑथेंटिकेशन) आधारित प्रमाणीकरण ही सेवा १ जुलै २०१८ रोजी सुरू केली जाणार आहे. अशी माहिती यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पांडे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
 
 
 
 
आधार क्रमांक ओळख पडताळणासाठी नोंदणी करतानाचा फोटोदेखील वापरला जाऊ शकतो. तसेच अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून दिले जातील. यूआयडीएआयच्या आधार क्रमांकच्या योग्य आणि यशस्वी पडताळणीसाठी फिंगरप्रिंट किंवा आयरीस किंवा ओटीपी एकत्र करणे आवश्यक असणार आहे. निवडक एयूएजवर यूआयडीएआय फिंगरप्रिंट आणि आयरीस बायोमेट्रिक प्रमाणीकरण प्रदान करणार असून फेस ऍथिकंटेशनला देखील आवश्यकतेनुसार मान्यता दिली जाईल, "अशी माहितीही यूआयडीएआयच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@