इराक बॉम्बस्फोटात मरणाऱ्यांची संख्या ३८ वर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |

इस्लामिक स्टेटचा हात असल्याचा संशय 



बगदाद :
इराकची राजधानी बगदाद येथे काल झालेल्या दोन साखळी बॉम्बस्फोटांमधील मृतांची संख्या ३८ वर जाऊन पोहोचली असून या घटनेत एकूण १०५ लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान या हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेचा हात असल्याचा दावा इराककडून करण्यात आला आहे.

राजधानी बगदादच्या अगदी मध्यभागी असलेल्या अल-तायरान स्केवअर येथे काल दुपारी हे दोन्ही स्फोट झाले. दुपारी १२ च्या आसपास तायरान स्केवअर जवळ दोन अतिरेकी आपल्या अंगावर स्फोटके घालून आले होते, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. यातील पहिल्या अतिरेक्यांनी याठिकाणी खरेदी करत असलेल्या नागरिकांच्या मध्यभागी काही घोषणा देत स्वतःला उडवून घेतले. त्यानंतर थोड्याच वेळात दुसऱ्या अतिरेक्याने देखील याच घटनेची पुनरावृत्ती करत. स्वतः देखील स्फोट घडवून आणला.



या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये गदारोळ उडाला व तातडीने स्थानिक पोलीसांनी पाचारण करण्यात आले. यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. स्फोटाच्या वेळी १५ ते २० नागरिकांचा जागीच मृत्यू झाला होता. तर काही नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अजून देखील अनेक नागरिक हे गंभीर जखमी असून मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील स्थनिक प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@