इराणच्या तेलवाहू नौकेला चीन सागरात आग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018
Total Views |

३२ लोकांचा जळून मृत्यू




चीन : इराणहून चीनच्या दिशेने निघालेल्या इराणच्या तेलवाहू नौकेला लागलेल्या भीषण आगीमध्ये ३२ खलाशांचा जळून मृत्यू झाला असून ही तेलवाहू नौका देखील पूर्णपणे नष्ट झाली आहे. सांची असे या तेलवाहू नौकेचे नाव असून चीन आरमाराने या खलाशांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु यामध्ये त्यांना कसल्याही प्रकारचे यश आलेले नाही.

पूर्व चीन सागरातून दक्षिण कोरियाकडे जात असता समुद्रात अचानकपणे आग लागल्यामुळे नौकेवर असलेले जवळपास ५० टन तेलाचा प्रचंड स्फोट झाला. या स्फोटामुळे निर्माण झालेले धूर हवेमध्ये एक ते दीड किलोमीटर पेक्षा उंच गेला होता. हा धूर पाहून पूर्व चीन सागरामध्ये गस्त घालत असलेल्या चीनी आरमाराने तातडीने घटनास्थळी धाव घेतली व नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत सर्व काही नष्ट झालेले होते. यानंतर तातडीने ही माहिती इराण सरकारला कळवण्यात आली. इराण सरकारने सर्व माहिती घेऊन घटनेची शाहनिशा करून घेतली.



इराणच्या सरकारकडून या सर्व मृत खलाशांची माहिती जाहीर करण्यात आली असून या घटनेवर दु:ख देखील व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नसून सर्व नागरिकांचे मृतदेह लवकरच इराणच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे चीनी नौदलाने म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@