'शत्रूराष्ट्रांवर कठोर कारवाई करू' : लष्करप्रमुख रावत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018
Total Views |

चीन-पाकिस्तानला थेट इशारा




नवी दिल्ली :
'पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर सातत्याने हल्ले होत आहेत. परंतु भारतीय सैन्येने देखील गेल्या काही दिवसांमध्ये यावर मोठी कारवाई करत, पाकिस्तानला याचे सडेतोड उत्तर दिलेले आहे. त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शत्रू राष्ट्रांवर कठोर कारवाई करू' असे घोषणा भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केली आहे. नवी दिल्लीतील करीअप्पा परेड मैदानावर 'लष्कर दिना'निमित्त आयोजित संचालनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

'पाकिस्तानचे सैनिक नेहमी दहशतवाद्यांना आणि भारतामध्ये घुसखोरी करणाऱ्यांना मदत करतात. त्यांच्या आडून ते नेहमी भारतावर हल्ले करतात. परंतु भारतीय लष्कर याला साडेतोड उत्तर देत असून पाकिस्तानने आपली मर्यादा ओलांडल्यास नाईलाजाने आम्हाला पाकिस्तानविरोधात अत्यंत कठोर कारवाई करावी लागेल' असे रावत यावेळी म्हणाले. तसेच भारतीय लष्कराकडून आणि गुप्तचर विभागाकडून ईशान्य भारतामध्ये सुरु करण्यात आलेल्या विविध मोहिमांची माहिती देत, भारतीय लष्कराची जनसामान्यांना सामावून घेण्याची वृत्ती आणि कार्यपद्धतीमुळे ईशान्य भारतातील दहशतवाद आणि घुसखोरी देखील मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आपल्याला यश येत असल्याचे रावत यांनी वेळी सांगितले.


याच बरोबर देशासमोर आणि भारतीय लष्करासमोर सध्या नवीन आव्हाने उभी राहत आहेत, असे ते म्हणाले. सध्या फेसबुक, व्हॉटस्अॅप या सारख्या सोशल मिडीयाच्या वापर भारतीय लष्कर आणि देशाविघातक कृत्य करण्यासाठी केला जात आहे, त्यामुळे या संबंधी भारतीय लष्कर आणि देशातील सर्व नागरिकांनी सजग राहिले पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी वेळी केले.
@@AUTHORINFO_V1@@