१ लाख ४४ हजारांची धाडसी घर फोडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
नंदुरबार : शहादा येथे धाडसी घर फोडी होवून १ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना उघडकिस आली असून याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
 
 
भुपेंद्र अरूण जोशी वय ३८, सुयश बंगला, सुवर्ण नगरी, डोंगरगाव रोड, शहादा हे बाहेरगावी गेले असल्याचा लाभ चोरटयांनी घेत त्यांच्या घराच्या पुढच्या दरवाज्याचे कुलूप १३ रोजी सकाळी १०.३० ते १४ च्या रात्री ९.१५ च्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी तोडून घरातील बेडरूममधील कपाट उघडून ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, ३० हजार रुपये किमतीचा हार, ३० हजार रुपये किमतीचा राणीहार, १५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे झुमके, ४०० रुपये किमतीची गणपतीची मुर्ती. ९ हजार रुपये रोख रक्कम असा १ लाख ४४ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सोमवार १५ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पो.नि.बुधवंत यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पुढीत तपास सपोनि शिंदे करत आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@