जनकल्याण समितीचा निधी संकलन सप्ताह सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत दरवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा निधी संकलन सप्ताह साजरा केला जातो. या काळात जनकल्याण समितीच्या कार्याची माहिती कार्यकर्ते समाजात पोहोचवतात व समाज घटकाच्या दान देण्याच्या वृत्तीला आवाहन करतात. मिळालेल्या देणगीची पावती ही देतात. देणगी आयकर कायद्यानुसार ८० जी अन्वये सवलतीस पात्र आहे.
 
रा. स्व. संघ जनकल्याण समितीने आवाहन केले आहे की, समितीच्या कार्यास देणगी देऊन सहकार्य करावे व आपल्या दान देण्याचा गुणाला कृतीरूप उजाळा द्यावा. अधिक माहितीसाठी ९३७१८०४९३७ या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच २०००/-रूपये व त्यावरील देणगीसाठी पॅन नंबर आवश्यक आहे. दाता देणगी चेकनेही देऊ शकतो. सदर चेक रा.स्व.संघ जनकल्याण समिती या नावाने असावा. ऑनलाईन ट्रान्स्फर केल्यावर ९३७१८०४९३७ या पे वर नाव, पत्ता, जन्म दिनांक, पेमेंट डिटेल्स, पॅन कार्ड असणे आवश्यक आहे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. ऑनलाईनही देणगी देऊ शकतो
 
@@AUTHORINFO_V1@@