राहुल राज्यात मोदींना ठरवले रावण; अमेठीत वादग्रस्त पोस्टर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018
Total Views |

 
अमेठी (उ. प्र.) : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा क्षेत्र असलेल्या अमेठी मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदींना रावण ठरविण्यात आले आहे. अमेठी येथे एका पोस्टरवर राहुल गांधी राम तर मोदींना दशानन रावण म्हणून प्रस्तुत केले गेले आहे.
 
 
हा प्रकार राहुल गांधी दोन दिवसीय अमेठी दौऱ्यावर असताना घडलेला आहे. राहुल याच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकाने हे पोस्टर लावल्याचे माहिती पडते. यात राहुल गांधी रामाच्या स्वरुपात दहा तोंड असलेल्या रावणाचा वध करताना दाखवले आहे. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून गळ्यातून रक्त येत असल्याची प्रतिमा दाखवली गेली आहे.
 
 
त्यावर लिहिले आहे की "राहुल के रूप में भगवान राम का अवतार २०१९ में आयेगा राहुल राज (राम राज)" अर्थात २०१९ साली नरेंद्र मोदी यांची सत्ता जाईल, अशी अशा वजा भाकीत या राहुल समर्थकाने केली आहे. मात्र या वादग्रस्त पोस्टरमुळे राजकीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर अद्याप काँग्रेस अथवा भाजप दोन्हीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी देखील माध्यमांमध्ये याची मोठ्याप्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@