अखेर पद्मावत २५ जानेवारीला प्रदर्शित होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018
Total Views |

 
 
 
मुंबई : अखेर "पद्मावती" हा चित्रपट पद्मावत नावाने २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रसिद्ध होणार आहे. दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांनी आपल्या ट्विटर खात्यांवरुन ही बातमी दिली आहे. १६ व्या शतकातील सुफी कवी मलिक मोहम्मद जयसी यांच्या प्रसिद्ध 'पद्मावत' या काव्यावर आधारित या चित्रपटांला सुरुवातीपासूनच टीकेला सामोरे जावे लागले. मात्र आता अखेर अनेक अडचणींनंतर तसेच प्रेक्षकांच्या खूप वाट पाहण्यानंतर पद्मावत येत आहे.
 
 
 
 
दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट तामिळ आणि तेलगु भाषेमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
 
 
वायाकॉम १८ ने 'पद्मावत' च्या जगभरातील प्रदर्शनाची तारीख २५ जानेवारी २०१८ जाहीर केली आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' हा पहिला सिनेमा आहे, जो वैश्विक ३ डी मध्ये प्रदर्शित होत आहे. सुचविण्यात आलेल्या फक्त ५ दुरूस्त्या केल्यानंतर CBFC (सेंटलर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) ने हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी U/A प्रदर्शन प्रमाणपत्रासह मान्यता दिलेली आहे.
@@AUTHORINFO_V1@@