भारत शूरवीरांना कधीही विसरू शकणार नाही; लष्कर दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018
Total Views |

 
भारतीय लष्कराने नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे. ज्या शुराविरांनी देशाच्या रक्षणार्थ प्राणाची आहुती दिली त्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. देश त्या शूरवीरांचा त्याग कधीही विसरू शकणार नाही. असे म्हणत पंतप्रधानांनी लष्कर दिनाच्या संपूर्ण देशाला शुभेच्छा दिल्या.
 
 
आज भारतीय लष्कर दिन दिनानिमित्त भारतीय लष्कराला शुभेच्छा दिल्या जात आहेत. लष्कराची कामगिरीचे सर्वस्तरातून आदरयुक्त कौतुक केले जाते. त्यातील हुतात्मा जवानांना देशभरातून मानवंदना दिली जात असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
लष्कराप्रती भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, आज लष्कर दिनानिमित्त मी लष्करातील सैनिक, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो. देशातील सर्व नागरिकांचे भारतीय लष्कराप्रती अविचल प्रेम, स्नेह, विश्वास आणि अभिमान आहे. भारतीय लष्कर देशाचे संरक्षण करण्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देखील नागरिकांच्या मदतीला सज्ज असते.
 
लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी काही दिवसांपूर्वीच लष्कर आणि राजकारणाने हातात हात घालून देशाचे संरक्षण करण्यची आवश्यकता असल्याचे सांगितले होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@