पंतप्रधान नेतन्याहू यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018
Total Views |


 
नवी दिल्ली : सहा दिवसीय भारत दौऱ्यावर असलेले इस्त्राईलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांचे राष्ट्रपती भवनात लष्करी इतमामात स्वागत करण्यात आले. यावेळी नेतन्याहू यांनी लष्कराचे अभिवादन स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांचे स्वगत केले.
 
भारत आणि इस्राईल यांच्यात नवी मैत्रीची पहाट उजाडली असल्याचे नेतन्याहू यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक इस्त्राईल भेटीनंतर दोन्ही देशांत एक नवीन उत्साह जागृत झाला आहे. हेच माझ्या भारत भेटीत देखील गिरवले जावे याची काळजी आम्ही सर्व घेत आहोत, असे नेतन्याहू यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये प्रेम, शांतता, आणि प्रगतीचा संचार होत राहावा अशी यापुढे अशा व्यक्त करतो.
 
या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नेतन्याहू पत्नी व कुटुंबासह राजघाट येथे पोहोचले, तेथे महात्मा गांधींच्या समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन केले. तेथे महात्मा गांधींच्या आदरार्थ त्यांनी संदेश देखील लिहिला. त्यात महात्मा गांधी यांना जागतिक प्रेरणादायी नेता म्हणून संबोधले.
 

 
@@AUTHORINFO_V1@@