ज्यू विरोधी वातावरण भारतात कधीही अनुभवायला मिळाले नाही - नेतन्याहू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018
Total Views |

 
नवी दिल्ली : गेल्या २ हजार वर्षात ज्यू विरोधी वातावरण भारतात कोठेही अनुभवायला मिळाले नाही, असे भारतात राहिलेले इस्त्राईल नागरिकांच्या भावना आहेत, असे प्रतिपादन इस्त्राईलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी भारत - इस्त्राईल द्विपक्षीय चर्चेनंतरच्या पत्रकार परिषदेत केले.
 
 
भारतीय संस्कृतीला त्यांनी अभिवादन केले. भारत आणि इस्त्राईल यांच्यात हजारो वर्षांपासून सांस्कृतिक साम्य असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले. भारत आणि इस्त्राईल दरम्यान नवी दिल्ली येथील हैदराबाद हाउस येथे द्विपक्षीय वार्तालाप घडून आली. त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 
 
 
या करारांत भारत इस्त्राईलकडून कृषी तंत्रज्ञानात साहाय्य घेणार आहे. तेथील सिंचन पद्धतीचा वापर करून भरतीय कृषी उत्पादने वाढविण्याची योजना आखली जाणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राईल मधील संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना मेक इन इंडियामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले आहे.
 
 
विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आदान प्रदान दोन्ही देशांत होण्याबाबत करार केला गेला आहे. स्वच्छता क्षेत्रासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो.
 
 
@@AUTHORINFO_V1@@