स्वच्छता मुल्यांकन करून प्रमाणपत्र देणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यात येत आहे. केद्र शासनाने कळविल्यानुसार राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे त्याअंतर्गत नाशिक मनपा क्षेत्रातील हॉटेल, शाळा, हॉस्पीटल तसेच मार्केट यामध्येही स्वच्छ सर्वेक्षण २०१८ राबवून त्या अंतर्गत स्वच्छता मुल्याकंनानुसार प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
 
यामध्ये द गेटवे हॉटेल, अंबड, नाशिक / हॉटेल एक्सप्रेस इन, पाथर्डी फाटा यांना प्रथम व हॉटेल आयबीआयएस ,सातपुर यांना दुसर्‍या क्रमांक देण्यात आला. तसेच मनपा शाळा क्रंमाक ९५ सातपुर प्रथम क्रमांक, मनपा शाळा क्रमांक ७२ अंबड दुसरा क्रमांक तसेच मनपा शाळा क्रमांक १०५ व ११ गणेश चौक यांना विभागुन तिसरा क्रमांक देण्यात आला. नाशिक रोड येथील जयराम हॉस्पीटल यांना प्रथम क्रमांक तसेच न्यु निनाद हॉस्पीटल यांना दुसरा क्रमांक व मानवता क्युरी हॉस्पीटल यांना तिसरा क्रमांक देण्यात आला. तसेच स्वच्छ मार्केट मध्ये परफेक्ट डाळिंब मार्केट, पंचवटी यांना प्रथम व शरदचंद्र मार्केट आरटीओ ऑफीस समोर यांना दुसरा क्रमांक देण्यात आले
 
@@AUTHORINFO_V1@@