भाजपने दिली एकनिष्ठेतेची पावती : शर्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : ‘‘अडचणीच्या काळात आजवर भाजपची साथ न सोडता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून एकनिष्ठेने काम केले. त्याचीच पावती म्हणून भाजपने जिल्हा नियोजन समितीवर निवड केल्याचे’’ ज्येष्ठ भाजप नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य मोहन शर्मा यांनी सांगितले.
 
नाशिक जिल्हा जॉंगीड ब्राह्मण समाजाच्या वतीने द्वारका परिसरातील जॉंगीड ब्राह्मण समाजाच्या कार्यालयात जिल्हा नियोजन समितीवर नियुक्त झालेल्या सदस्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन समितीवर सदस्यांची नियुक्ती केली आहे. त्यात चांदवडचे भाजप नेते व नाशिक जिल्हा जॉंगीड ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष मोहन शर्मा, सिन्नरचे प्रकाश नन्नावरे, निफाडचे शंकरराव वाघ यांचा समावेश असून, जॉंगीड ब्राह्मण संघाच्या वतीने शर्मा, नन्नावरे व वाघ यांचा सत्कार करण्यात आला.
 
@@AUTHORINFO_V1@@