‘बिल्डर्स असोसिएशन’ देणार बांधकामासाठी पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ द्वारा ‘बिल्डर्स दिन’ साजरा करण्यात येणार असून त्या निमित्ताने ‘प्रोजेक्ट एक्सलन्स पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. यावर्षी साजर्‍या होणार्‍या या दिवसाचे ब्रीदवाक्य ‘भविष्यातील भारत’ आहे. संस्थेतर्फे हे प्रतिष्ठाप्राप्त पुरस्कार दर दोन वर्षांनी देण्यात येतात.
 
या पुरस्कारामध्ये इमारतीची एकूण गुणवत्ता, त्यातील सोयी व दर्जा याचा ही विचार करण्यात येतो. याचसोबत पर्यावरणपूरक बांधकाम ही संकल्पना केंद्रस्थानी राहणार असून पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी दोन स्वतंत्र ज्युरीची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष गोपाल अटल यांनी दिली. भारतातील वेगाने वाढणारे शहर म्हणून नाशिकचे नाव घेतले जाते. कोणत्याही वाढत्या शहरात बांधकामाचे महत्व असते.
 
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेद्वारे दिले जाणारे हे पुरस्कार नाशिकमध्ये १७ फेब्रुवारी रोजी एका राज्यस्तरीय परिषदेत प्रदान करण्यात येतील. या परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष विजय शेट्टी व राज्याध्यक्ष राजेंद्र आठवले हे उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराच्या श्रेणी शासकीय इमारती, हॉटेल्स व रिसॉर्टस्, औद्योगिक बांधकामे, समूह गृहप्रकल्प (८ हजार स्क़्वे.मी.पर्यंत),व्यावसायिक प्रकल्प, संस्थात्मक प्रकल्प, हाऊसिंग प्रोजेक्ट (एकल योजना), समूह गृह प्रकल्प(८००० स्क़्वे.मी.पुढील) अशा आहेत.
 
अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयास ९८६०७४४७०८ शी संपर्क साधावा. या पुरस्काराने नाशिक शहरातील बांधकाम व्यवसायास प्रेरणा मिळेल असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस अध्यक्ष गोपाल अटल, सेक्रेटरी अरविंद पटेल, विलास बिरारी, दीपक धारराव, रामेश्वर मालाणी, मनोज खांडेकर, राहुल सूर्यवंशी, राजेंद्र मुथा, निशीत अटल आदी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@