नक्षलींवर संक्रांत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018   
Total Views |
 
 
 
 
या वेळची संक्रांत कोणावर आली आहे? हा प्रश्‍न आजही विचारला जातोच? यावेळची संक्रांत कोणावर आली होती? डहाणू परिसरात बुडालेली बोट आणि मृत्यूमुखी पडलेले ते कोवळे जीव. जूहु येथून ओएनजीसीच्या तळाकडे निघालेले हेलिकॉप्टरही डहाणूजवळ समुद्रात कोसळले तर सांगलीला ट्रॅक्टर आणि क्रूझरला झालेल्या भीषण अपघातात सहा पहिलवानांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन राष्ट्रीय खेळाडूंना आपण गमावले आहे. महाराष्ट्रभर दु:खाची कळाच अवतरली. या घटनांशी साधर्म्य नसलेली पण तितकीच गंभीर घटना ही महाराष्ट्रात खुद्द मुंबईत घडली.
 
प्रत्यक्ष मुंबईजवळच्या कल्याणमध्ये नक्षलीला एटीएसच्या कर्तव्यदक्ष खात्याने पकडले. त्याच साखळीत पुढे सहा नक्षली पकडले गेले. हे नक्षली मुंबईच्या घाटकोपर, विक्रोळी परिसरात दबा धरून होते. त्यापैकी एकाने डोंबिवलीला बस्तान बसवले होते. या सगळ्यांकडे समाजविघातक साहित्य आढळले. विचार विघातक कृत्यांनी देशाला समाजाला धोकादायक ठरत असलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या माओवादी विचारसरणीच्या पक्षाला देशात बंदी आहे. कारण सरळ आहे. या देशामध्ये क्रांतीसाठी जरी मुक्तद्वार असले तरी या देशाची संस्कृती शांतीप्रिय समरस एकात्मतेमध्ये आहे. नेमक्या याच मुल्यांच्या विध्वंसाचे घातक मनोकामना करणारी सीपीआय पक्षाची विचारधारा.
 
 
या विचाराधारेला आधार मानून भारतीय समाजात विघातक विचार पेरण्याची कामगिरी करण्यासाठी हे नक्षली मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आले असावेत असा कयास आहे. नाही असा अंदाज म्हणण्यापेक्षा हे खरेच म्हणायला हवे कारण पकडलेल्या संशयितांकडे समाजाच्या भावना भकडवणारे, मानसिकता विघातक पद्धतीने चिथाऊ शकणारे आक्षेपार्ह लिखित साहित्य आढळले. आता कुणी म्हणेल इथे बंदुका, बॉम्ब अगदी मानवी बॉम्ब आढळतात, तर या लिखित साहित्याचे काय घेऊन बसलात. पण जो बात तलवार से नही होती वो कलमसे होती है.. सामाजिक अस्मितेचा असलेला नसलेला मुद्दा तापवून त्यात स्थानिक भाबड्या जनतेला भरीस पाडून समाजात आणि देशातही अराजक माजवता येऊ शकते. ही बाब या नक्षलींनीही मान्यच केली असेल. वय वर्षे ३७ ते ५० च्या आतले हे नक्षली तेलंगाणाहून इथे मुंबईत आले होते. वेळीच त्यांना जेरबंद केले हे नशिब.. यंदाची संक्रात या देशद्रोह्यांवर येवो.
 
- योगिता साळवी  
@@AUTHORINFO_V1@@