बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसीय भारत दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
दिल्ली: इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आजपासून सहा दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. आज नवी दिल्ली येथील विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले आहे. सगळ्या प्रकारचे ‘प्रोटोकॉल’ तोडून नरेंद्र मोदी स्वत: बेंजामिन नेतन्याहू यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहिले.
 
 
 
 
 
विमानतळावर बेंजामिन नेतन्याहू यांचे औपचारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. तसेच विमानतळावरून नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतन्याहू हे थेट तीन मूर्ती हाइफा चौक येथे युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी रवाना झाले. येथे नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धात शहीद झालेल्या जवानांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
 
 
 
 
 
यावेळी भारत आणि इस्राईलच्या मैत्रीला समर्पित करत तीन मूर्ती या चौकाचे नाव हाइफा चौक असे करण्यात आले असल्याची घोषणा करण्यात आली. बेंजामिन नेतन्याहू यांचा हा दौरा ऐतिहासिक दौरा मानला जात आहे. २००३ नंतर भारत भेटीला आलेले बेंजामिन नेतन्याहू हे पहिले इस्राईलचे पंतप्रधान आहेत. 
 
 
 
 
भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांचे संबंध घट्ट होण्याच्या दृष्टीने हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. भारत भेटीसाठी सहा दिवस भारतात येणारे इस्राईलचे हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. तसेच काही काळापासून भारत आणि इस्राईलचे संबंध अतिशय चांगले असल्याने हा दौरा दोन्ही देशांसाठी महत्वाचा ठरणार आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@