‘धक धक गर्ल’ माधुरी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
‘धक धक गर्ल’ माधुरी दिक्षित-नेने ही लवकरच मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसणार आहे. माधुरी यावेळी हिंदी चित्रपटातून नाही तर चक्क मराठी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातून माधुरी पुन्हा एकदा चित्रपटगृह गाजविणार आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी माधुरी हिने स्वत:ने ही गोड बातमी आपल्याला दिली आहे.
 
 
 
 
तिच्या स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरून तिने या चित्रपटाचे पहिले पोस्टर आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. या पोस्टरमध्ये माधुरी अगदी साधी घरगुती स्त्री दाखवण्यात आली आहे. माधुरीचा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. त्यामुळे ‘मकरसंक्रांतीच्या दिवशी माझ्याकडून मराठी लोकांसाठी ही छान गोड गोड भेट’ अशा शब्दांमध्ये माधुरी हिने ट्वीटरवर लिहून हे पोस्टर शेअर केले आहे. 
@@AUTHORINFO_V1@@