भारत वि. आफ्रिका : आफ्रिकेकडे अद्याप १५२ धावांची आघाडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |

दुसऱ्या दिवसअखेर भारत ५ बाद १८३ धावांवर




सेंच्युरीयन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील आजच्या दिवसाचा खेळ समाप्त झाला असून आज दिवसअखेरपर्यंत भारताच्या ५ बाद १८३ धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे अद्याप १५२ धावांची आघाडी असून आफ्रिकेने पहिल्या डावामध्ये ३३५ धावा केलेल्या आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहली याने आज पुन्हा एकद्या आपल्या नेहमीच्या खेळीचे प्रदर्शन करत, आजच्या डावात अर्धशतकी खेळी केली आहे.


सेंच्युरीयन येथील सुपर स्पोर्ट पार्क येथील मैदानावर आज दुपारनंतर भारताच्या डावाला सुरुवात झाली. भारताकडून मुरली विजय आणि लोकेश राहुल हे दोघे मैदानात सलामीसाठी उतले होते. परंतु थोड्याच्या वेळात भारताला पहिला धक्का देत लोकेश राहुल अवघ्या १० धावांवरच एम.मॉर्केलने धाडले. यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराला देखील शून्यावरच बाद करत आफ्रिका संघाने भारताला आणखीन एक धक्का दिला. अवघ्या ९ षटकांमध्येच भारताच्या २ बाद २८ धावा अशी स्थिती झाली होती. यानंतर मैदानात उतरलेल्या कर्णधार विराट कोहलीने मुरली विजयच्या साथीने भारताचा डाव सावरण्यास सुरुवात केली. 


मुरली विजय आणि कोहालीने भारतीय संघाला १०० धावांचा टप्पा पार करून दिल्यानंतर थोड्याच वेळात मुरली विजय देखील ४६ धावांवर परत फिरला. यानंतर रोहित शर्मा (१०) आणि पार्थिव पटेल (१९) आल्या पावली परत फिरले. यानंतर आलेल्या हार्दिक पंड्यासह विराटने ८५ धावांची खेळी केली. तसेच पंड्याने देखील दिवसअखेरपर्यंत ११ धावांची खेळी केली.


तीन कसोटी सामन्याच्या या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्याकडून भारताला मोठी आशा लागलेली आहे. काल सामन्याच्या सुरुवातीला आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी आफ्रिका संघाने नेहमीप्रमाणे आपल्या आक्रमक खेळीचे प्रदर्शन करत खेळाला सुरुवात केली होती. आफ्रिका संघातील अडेन मार्क्रम (९४), हाशीम अमला (८२) फाफ डू प्लेसीस (६३) आणि डेंन इल्गर (३१) या खेळाडूंच्या बळावर आफ्रिका संघाने पहिल्याच डावात ३३५ धावांची मजल मारली होती. या बदल्यात भारताकडून आर. अश्विन याने एकट्याने आफ्रिकेचे ४ गडी बाद केले होते. त्यापाठोपाठ इशांत शर्मा याने ३ तर मोहम्मद शमी यांने १ गडी बाद केला होता.

आफ्रिकेचा पहिला डाव : 
 

 
भारताच्या पहिला डाव (सुरु) :  




@@AUTHORINFO_V1@@