संयुक्त राष्ट्रातील भारतीय राजदुताचे ट्विटर हॅन्डल हॅक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |

 
संयुक्त राष्ट्रातील कायमचे भारतीय राजदूत सय्यद अकबरुद्दिन यांचे ट्वीटर हॅन्डल तुर्की आणि पाकिस्तानी हॅकर्सद्वारे हॅक केले गेले होते. अकबरुद्दिन यांच्या ट्वीटर हॅन्डलवर पाकिस्तानी झेंडा पोस्ट करण्यात आला होता. त्याचबरोबर तुर्की भाषेत त्यांना संदेश देखील पाठविला गेला होता.
 

 
हा सर्व प्रकार रविवारी उघडकीस आल्यानंतर ट्विटर इंडियाने त्वरित कारवाई केली. हॅकर्सद्वारे अकबरुद्दिन यांच्या ट्वीटर हॅन्डल ब्लू टीक देखील गायब करण्यात आले होते. त्यांच्या ट्वीटर हॅन्डलवरून वेगवेगळ्या पोस्ट करण्यात आल्या होत्या. राज कपूरचे 'आवारा हू' या गाण्याची युट्युब लिंक त्यावर पोस्ट केली गेली होती. मात्र ट्विटर इंडियाच्या मदतीने त्वरित ट्विटर हॅन्डलला पूर्वस्थितीत आणले गेले.
 

 
यावर अकबरुद्दिन यांनी ट्विटर इंडिया टीमचे आभार मानले. आणि लिहिले की, मी पुन्हा आलो आहे. मला खाली खेचण्यासाठी हॅकपेक्षा खूप जास्त परिश्रम करावे लागतील, असा टोला देखील त्यांनी हॅकर्सना लगावला.
 
 
@@AUTHORINFO_V1@@