इस्राईलचा भारत सगळ्यात चांगला मित्र: बेंजामिन नेतन्याहू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
इस्राईलचा भारत हा सगळ्यात चांगला मित्र आहे असे मत इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यक्त केले आहे. भारत दौऱ्यावर येण्याच्या आधी त्यांनी एक पत्र लिहिले होते या पत्रामध्ये त्यांनी वरील मत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले सगळ्यात चांगले मित्र असल्याचे त्यांनी यावेळी या पत्रात स्पष्ट केले आहे.
 
 
 
 
दोन्ही देशांना व्यापार, सुरक्षा, पर्यटन, औद्योगिक आणि विमान क्षेत्रात मदत हवी असल्याने दोन्ही देश मैत्रीच्या नात्याने अजून एकत्र येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. भारत दौऱ्यावर आल्यावर नरेंद्र मोदी माझ्यासोबत असतील, या दौऱ्यात आम्ही भारतातील प्रमुख स्थळांना भेट देवू तसेच नरेंद्र मोदी यांचे जन्मगाव येथे देखील आम्ही जावू अशी माहिती त्यांनी या पत्रातून दिली आहे. 
 
 
 
मागील वर्षीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्राईलचा दौरा हा ऐतिहासिक होता. त्यामुळे या मैत्रीला अजून घट्ट करण्यासाठी मी १४ जानेवारीला सहा दिवसीय भारत दौऱ्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 
 
@@AUTHORINFO_V1@@