बेपत्ता 'हंस'ला शोधण्यासाठी नौदलाचे मोठे बचाव कार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |

 
मुंबई : १३ जानेवारी २०१८ रोजी बेपत्ता हंस हेलिकॉप्टरला शोधण्यासाठी भारतीय नौदलाने मोठ्याप्रमाणावर बचाव कार्य सुरु केले आहे. टी११, टी४५, तरसा आणि तेग या चार नौदलाच्या जहाज बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर शोध मोहिमेत सज्ज झाल्या आहेत.
 
 
यासाठी एक विमान आणि एक हेलिकॉप्टर देखील धाडण्यात आले आहे. मुंबईच्या जुहू येथून हंस हेलिकॉप्टर निघाले होते. मुंबईच्या उत्तरेच्या दिशेने असलेल्या तेल उकरणी 'NQO' च्या दिशेने हंसचा प्रवास सुरु होता. अवघ्या अर्ध्या तासात हेलिकॉप्टरशी असलेला संपर्क तुटला. त्यात ३ प्रवासी आणि २ पायलट आहेत. मात्र अद्यापही हेलिकॉप्टरशी संवाद होऊ शकलेला नाही.
 
 
नौदलाने हंसच्या शोधासाठी पूर्णपणे कंबर कसलेली आहे. यासाठी अजून एक विमान आणि बचाव हेलिकॉप्टर देखील तयार ठेवले आहे. गरज पडल्यास त्याचा उपयोग करण्यात येईल. हाती लागलेल्या माहितीनुसार हंसचे काही अवशेष मुंबईच्या सागरी भागात मिळालेले आहेत. त्याच बरोबर त्यातील शवांचा देखील शोध सुरु आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@