अंडर १९ विश्वचषक: भारताचा ऑस्ट्रेलियावर १०० धावांनी विजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
माउंट मौनगुनिया : माउंट मौनगुनिया येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर १९ विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया १०० धावांनी विजय मिळविला आहे. या चषकात भारताचा हा पहिलाच सामना होता आणि पहिल्याच सामन्यात भारताची सुरुवात दमदार झाली आहे.
 
 
 
पहिल्याच सामन्यात भारतीय अंडर १९ क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला १०० धावांनी मागे टाकत पहिला सामना जिंकला आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय अंडर १९ क्रिकेट संघ खेळत असून पृथ्वी शॉ याने कर्णधार पदाला साजेशी अशी खेळी या सामन्यात खेळली आहे.
 
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे प्रथम मैदानावर पृथ्वी शॉ आणि मनजोत कालरा यांची जोडी उतरली. दोन्ही खेळाडूंनी उत्तम धावसंख्या करत भारताची पकड या खेळावर मजबूत केली मात्र दोन्ही खेळाडूंचे शतक काही धावांनी हुकले.
 
पृथ्वी शॉ याने ९४ धावा केल्या तर मनजोत कालरा याने ८६ धावा करत भारताची भक्कम बाजू या सामन्यात तयार करून दिली. ऑस्ट्रेलियाचा सामना सुरु झाल्यावर भारताने एकामागून एक गडी बाद करत ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास धुळीस मिळविला आणि तब्बल १०० धावांनी हा सामना भारताने आपल्या नावावर करून घेतला. 
 
@@AUTHORINFO_V1@@