पंतप्रधानांच्या गळाभेटीमुळे काँग्रेस अस्वस्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |

 
राजकीय क्षेत्रात कोणत्या विषयावरून राजकारण केले जाईल, हे सांगणे खूप कठीण असते. सत्ताधारी, विरोधक एकमेकांवर चिखलफेक करत असतात. मात्र ते कोणत्या स्तरापर्यंत जाईल, याबद्दल शाश्वती देणे अवघड असते. सध्या देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष या स्थितीतून जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली दिसून येत आहे.
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांच्या पंतप्रधान अथवा अध्यक्षांना भेटल्यानंतर गळाभेट करत असतात. त्यावरून आत्तापर्यंत मोदींनी किती लोकांच्या गळाभेटी केल्या याबाबत ट्रोल करणारा एक व्हिडीओ काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्विट केला गेला आहे.
 
 
इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज सहा दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने गळाभेट करत त्यांचे स्वागत केले. त्यावर काँग्रेसने राजकीय टिप्पणी करण्याचा एक प्रयत्न केला आहे.
 
 
याला सोशल मीडियातून निषेध व्यक्त करणारा प्रतिसाद देखील लाभत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@