नरेंद्र मोदी यांच्याकडून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
दिल्ली: आज मकरसंक्रांतीचा सण असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा देत नागरिकांच्या जीवनात भरभरून आनंद येवो अशी इच्छा व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरून नागरिकांना वेगवेगळ्या भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
 
 
 
लोहरी, माघ बिहू, पोंगल, उत्तरायण आणि मकर संक्रांती असे विविध सण विविध राज्यात साजरे केले जात असल्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना या सणांच्या शुभेच्छा ट्वीटर वरून दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील सगळ्या देशबांधवांना पोंगल आणि मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@