बीसीआयच्या सदस्यांनी घेतली चेलामेश्वर यांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |



नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावर झालेल्या आरोपानंतर या विषयावर चर्चा करण्यासाठी बार काउंसिल ऑफ इंडियाच्या (बीसीआय) सदस्याने आज सर्वोच्च न्यायालायचे न्यायाधीश जे.चेलामेश्वर यांच्या नवी दिल्ली येथे भेट घेतली आहे. तसेच चेलामेश्वर आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी केलेल्या आरोप व इतर मुद्द्यांवर त्यांनी या बैठकीत चर्चा केली. दरम्यान बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

बीसीआयचे संचालक मनन मिश्रा यांनी या भेटी पत्रकारांना प्रतिक्रिया देतांना बैठकीमधील चर्चेचे मुद्द्यांविषयी बोलणे टाळले. तसेच हा न्यायव्यवस्थेचा पूर्णपणे अंतर्गत मुद्दा असून लवकरच तो सोडवला जाईल, असे ते म्हणाले. याच बरोबर चार न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला गैर ठरवत, न्यायाधीशांनी शेवटचा पर्याय म्हणून पत्रकारांसमोर येऊन अशा प्रकारचे भाष्य करणे अत्यंत चुकीचे आहे, असे मिश्रा यांनी म्हटले. याच बरोबर नवी दिल्लीतील इतर काही दिग्गज वकील आणि न्यायाधीशांची देखील बीसीआय सदस्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली.

गेल्या शुक्रवारी चेलामेश्वर आणि त्यांच्या अन्य चार साथीदार न्यायाधीशांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन न्यायपालिकेच्या कारभारामध्ये गोंधळ होत असल्याचा आरोप केला होता. चेलामेश्वर आणि त्यांच्या साथीदारांच्या या आरोपानंतर संपूर्ण देशभरात एक नवीनच वाद सुरु होता. विरोध पक्ष आणि डाव्या विचारवंतांकडून न्यायाधीशांच्या वक्तव्याला पाठींबा दिला जात होता. परंतु त्याच दरम्यान देशभरातील वकील आणि न्यायाधीशांकडून या परिषदेवर टीका देखील केली जात होती. न्यायाधीशांच्या असा आरोपांमुळे देशातील सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल, अशी टीका अनेक वरिष्ठ न्यायाधीशांनी केली होती.
@@AUTHORINFO_V1@@