चंद्रपूर जिल्हयाच्या २०१८-१९ च्या ३७६.९२ कोटीच्या वार्षिक आराखडयास मंजूरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हयाच्या विकासासाठी निधीची कमी पडणार नाही. मात्र सामान्य नागरिकांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल घडविणारे नियोजन अधिका-यांनी करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 
त्यांनी आज चंद्रपूर जिल्हयाच्या सन २०१८-१९ च्या ३७६.९२ कोटीच्या वार्षिक आराखडयास मंजूरी दिली. यावर्षी अधिका-यांनी ७८८.९५ कोटीचा नियतव्यय प्रस्तावित केला होता. शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेत ३७६.९२ कोटीच्या आराखडयास राज्य शासनाकडे मंजूरीसाठी शिफारस केली आहे.
 
जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनामध्ये पार पडली.  जिल्हयाच्या नियोजनामध्ये सर्वाधिक प्राधान्य शिक्षण, आरोग्य व पिण्याचे पाणी यांना देण्याबाबत पालकमंत्र्यांनी सुचना केली होती. त्यांच्या सूचनेनुसार गेल्या अनेक बैठकामध्ये जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात प्रत्येक विभागाच्या अधिका-यांनी आपल्या विभागाच्या आराखडयाची मांडणी केली होती. 
@@AUTHORINFO_V1@@