थंडीमुळे नेपाळमध्ये दोन दिवसांमध्ये १५ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2018
Total Views |

काठमांडू : हिमालय पर्वताच्या कुशीत असलेल्या नेपाळमध्ये सध्या थंडीने मोठा कहर केला आहे. नेपाळमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या दोनच दिवसांमध्ये नेपाळमधील १५ नागरिकांना आपला प्राण गमाववा लागला आहे. तसेच या महिन्यामध्ये थंडीमुळे नेपाळमध्ये मरण पावलेल्या नागरिकांची संख्या ४५ च्या वर पोहचली आहे.

उत्तरेमध्ये पसरलेल्या थंडीचे भीषण परिणाम नेपाळ, चीन, भूतानसह उत्तर भारतातील काही देशांमध्ये पाहायला मिळत आहे. नेपाळ हे हिमालय पर्वताच्या अगदी ख़ुशीमध्ये वसलेले असल्यामुळे अनेक ठिकाणी रात्रीचा पारा हा दोन ते शून्य अंश सेल्सिअसपेक्षा देखील खाली जात आहे. त्यामुळे काठमांडू सह संपूर्ण देशामध्ये सध्या थंडीने कहर केला आहे. यातून दोन दिवसांमध्ये १५ नागरिकांचा थंडीमुळे प्राण गेला आहे.

गेल्या आठवड्यामध्ये देखील थंडीमुळे २९ नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे अवघ्या दोन आठवड्यामध्ये नेपाळमध्ये थंडीमुळे ४५ नागरिकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उत्तर भारतामध्ये देखील या थंडीचे काही प्रमाणात परिणाम जाणवत असून गेल्या दिवसांपूर्वी उत्तर भारताचे तापमान देखील पाच ते सहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते.
@@AUTHORINFO_V1@@