जळगावात सहकार भारती स्थापना दिन साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
सहकार भारती व जळगाव जनता सहकारी बँक यांच्या वतीने सहकार भारती स्थापना दिन साजरा
 
 
 
जळगाव :
जळगाव जनता सहकारी बँक व सहकार भारती यांच्या वतीने गुरुवार दि.११ जानेवारी २०१८ रोजी जळगाव जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात सहकार भारती स्थापना दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सहकार भारतीचे संस्थापक कै.लक्ष्मणराव इनामदार यांच्या प्रतीमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व पूजन करून करण्यात आली. सौ.जोहरी यांनी सहकार गीत सादर केले. सहकार भारतीच्या बचत गट प्रमुख सौ.रेवती शेंदुर्णीकर यांनी सहकार भारती विषयक माहिती विषद करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
 
सहकार भारतीचे क्षेत्रीय सह संघटन मंत्री दिलीपदादा पाटील यांनी कै.लक्ष्मणराव इनामदार यांच्या कार्याची विस्तृत माहिती माहिती आपल्या मनोगतात व्यक्त केली. तसेच जळगाव जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ.प्रताप जाधव यांनी सहकार क्षेत्राद्वारेच ग्राम विकास होणार आहे त्यामुळे सहकार क्षेत्र भक्कम करण्याचे काम करावे असे आवाहन केले. यावेळी सहकार भारतीचे अखिल भारतीय बँक प्रकोष्ठ प्रमुख श्री संजय बिर्ला ,सहकार भारतीचे जिल्हा अध्यक्ष श्री विवेक पाटील,शहर अध्यक्षा सौ.अनिता वाणी, तसेच जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक श्री सतीश मदाने, सौ.सावित्री साळुंखे ,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुंडलिक पाटील तसेच सहकार भारतीचे पदाधिकारी व जळगाव जनता सहकारी बँकचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
" बिना संस्कार,नही सहकार " या तत्वावर चालणारी सहकार भारती या संस्थेची स्थापना लक्ष्मणराव इनामदार यांच्या पुढाकाराने सन १९७९ साली करण्यात आली. सदर संस्था देशातील २७ राज्यातील ४०० जिल्ह्यात प्रसारित असून २० हजार पेक्षा जास्त सहकारी संस्था सहकार भारतीशी जोडलेल्या आहेत.
 
भारततात विविध क्षेत्रात सहकार भारतीने विविध संस्था संघटीत केल्या आहेत. जसे शेती / कृषी व्यवसायासाठी दुग्ध व्यवसायाशी संबंधित व्यवसाय,विणकाम,मछीमार ,कर्ज ,महिला सक्षमीकरण, नागरी,गुह अशा विविध क्षेत्रात सहकार भारतीने सहकारी संस्था संघटीत केल्या आहेत. स्वयंसहाय्यता बचत गटांना प्रोत्साहन देणारी हि संस्था असून सहकार भारतीने ४० हजार हून अधिक स्वयंसहाय्यता बचत गट व संयुक्त दायित्व गट स्थापन केले आहेत.सहकार भारतीने प्रशिक्षण क्षेत्रात केलेल्या प्रगतीस अनुसरून महाराष्ट्र शासनाने संस्थेस सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेचा दर्जा दिला आहे.
@@AUTHORINFO_V1@@