झी टॉकीज आता क्रीडाप्रकारातूनही करणार मनोरंजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |


 
संस्कृती आणि कला यांचा मिलाप साधत झी टॉकीज सातत्याने रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी प्रयत्नशील असतं. हीच परंपरा कायम राखत, आपल्या रांगड्या संस्कृतीचा वारसा पुढे नेत, आपल्या मर्दानी मातीतला कुस्तीचा खेळ महाराष्ट्राच्या घराघरात पोहचवण्यासाठी 'ताकदीची कुस्ती आणि मनोरंजनाची मस्ती' हे घोषवाक्य घेऊन झी टॉकीज 'महाराष्ट्र कुस्ती लीग 'या भव्यदिव्य स्पर्धेचे आयोजन करीत आहे. ‘झी टॉकीज’ने आजवर अनेक वैविध्यपूर्ण सिनेमे आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची पर्वणी देत आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मराठी माणसाने कितीही प्रगती केली, तंत्रज्ञानाची शिखरं गाठली तरी त्याच्या मनात या मातीविषयीची ओढ रुजलेली असते. याच मातीशी नाळ जोडणारा क्रीडाप्रकार म्हणजे कुस्ती.
 
 
झी टॉकीज महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल खेळ आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलं आहे. त्यासाठी “महाराष्ट्र कुस्ती लीग” हा एक विलक्षणीय उपक्रम झी टॉकीजतर्फे आयोजित केला आहे. याच उपक्रमाची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, आणि राज्यसभा सदस्य सुभाष चंद्रा यांची उपस्थिती असणार आहे.
 
झी टॉकीज आणि झी युवाचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, "महाराष्ट्राला कुस्ती या क्रीडाप्रकाराची वैभवशाली परंपरा लाभली आहे. या रांगड्या मातीत घडलेल्या पैलवानांनी महाराष्ट्रासोबत देशाचेही नाव उंचावले आहे आणि म्हणूनच हा खेळ महाराष्ट्राच्या घराघरात पोहचावा, या क्रीडाप्रकाराची लोकप्रियता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने आम्ही हा अभूतपूर्व उपक्रम राबवत आहोत. आमच्या या उपक्रमातून २०२० साली जपान येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आम्ही तयार करू शकू असा मानस आम्ही बाळगतो "
 
 
@@AUTHORINFO_V1@@