Aapla Manus Teaser : ''तुमचेच नाही, सगळ्यांचेच स्टेटमेंट मी फाट्यावर मारतो''

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |

 
नाना पाटेकर मोठ्या पडद्यावर दिसणार म्हणेज त्या कलाकृतीत दम असणारच हे ते पक्कच असतं . पण त्याच्या मूळ व्यक्तिरेखेतला राकट पणा चित्रपटाच्या व्यक्तिरेखेसाठी नेमका कसा वापरला असेल याची उत्सुकता त्याचा प्रत्येक नवीन चित्रपट येताना असतेच. याची परिणीती त्याच्या आगामी 'आपला मानूस'चा टिझर बघितल्यावर होते. ''तुमचेच नाही, सगळ्यांचेच स्टेटमेंट मी फाट्यावर मारतो.'' या आशयाचा एक संवाद आपल्याला या टिझर मधून पाहायला मिळतो.
 
 
 
या चित्रपटाचा निर्माता अजय देवगण व दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर आज हा टिझर पोस्ट केला आहे. टिझर पोस्ट करताना अजय देवगण म्हणतोय ''आता मजा सुरु होणार आहे.'' 'आपला मानूस'मध्ये नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत असून ते गुन्हे शाखेतील एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक असणाऱ्या मारुती नागरगोजेची भूमिका साकारत आहेत. त्याबरोबरच सुमित राघवन व ईरावती हर्षे देखील या चित्रपटात आपल्याला दिसतील.
 
नानांची भूमिका नेहमीप्रमाणे एकूणच भेधडक असल्याचे पुन्हा एकदा हा टिझर पाहिल्यावर दिसत आहे. ९ फेब्रुवारी २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. काही दिवसांपूर्वीच अजय देवगणने या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत पदार्पण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

 
@@AUTHORINFO_V1@@