कुलदिपक विद्यालयात युवा सप्ताहास सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
 
 
 
 

सप्ताहाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन

 
नंदुरबार : स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कुलदिपक माध्यमिक विद्यालय झामणझर (ता.नवापूर) येथे १२ ते १८ जानेवारी २०१८ दरम्यान युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा, क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
 
 
 
दि. १२ जानेवारी २०१८ रोजी स्वामी विनेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.बी.वाघ यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन युवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी वर्क्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सप्ताहाच्या दुसर्‍या दिवशी गडद आश्रम शाळेचे शिक्षक अमोल कांबळे यांनी विवेकानंद यांचे जीवन चरित्र व युवाशक्ती याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता. यावेळी विद्यालयातील वरिष्ठ शिक्षक एस.व्ही.बेहेरे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले.
 
 
 
अध्यक्षीय भाषणात श्री.बेहेरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रेरणा घ्यावी आणि त्यातून आपले जीवन समृद्ध करावे. या युवा सप्ताह दरम्यान विद्यालयात आनंद मेळावा, क्रीडास्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप होणार आहे. सूत्रसंचालन पी.एम.नवरे यांनी केले. तर आभार आर.बी. महीरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@