लहानपणी अशी दिसायची 'सखी'!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |

 
मराठी चित्रपट सृष्टीत एक दर्जेदार अभिनेता म्हणून मोहन गोखले यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शुभांगी व मुलगी सखी यांनीही आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकत मोहन यांच्या नावाला साजेसे असेच कार्य केले. आज झी टॉकीजने सखी व मोहन गोखले यांचा एक छानसा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सखी अतिशय गोड, निरागस दिसत असून मोहन यांच्या ऐन तारुण्यातला हा फोटो असावा असा अंदाज आहे.
 
 
हॅशटॅग विंटेज टॉकीज या सदराखाली झी टॉकीजने हा फोटो प्रसिद्ध केला आहे. जुन्या चित्रपटातील किंवा जुन्या आठवणींना उजाळा देणारे 'रेअर फोटो' या सदरात प्रसिद्ध केले जातात. आज प्रसिद्ध झालेल्या फोटोमुळे सखीचा लहानपणीचा चेहरा तर नेटिझन्सला बघायला मिळालाच पण त्याबरोबरच पुन्हा एकदा मोहन गोखले यांच्या बहारदार, सामर्थ्यवान अभिनयाच्या आठवणीला उजाळा मिळाला! 'दिल दोस्ती दुनयादारी' मालिकेमुळे सखी घराघरात पोहचली होतीच पण सध्या तिचे 'अमर फोटो स्टुडिओ' हे नाटक देखील प्रचंड गाजत आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@