राकेश शर्मा यांचा आज ६९ वा जन्मदिवस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
अंतराळवीर राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक आहेत. आज त्यांचा ६९ वा जन्मदिवस आहे. अंतराळात गेल्यावर राकेश शर्मा यांना तत्कालीन दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारत अंतराळातून कसा दिसतो? हे विचारले असता राकेश शर्मा यांनी 'सारे जहां से अच्छा, हिंदुस्थान हमारा’ या शब्दांमध्ये उत्तर दिले होते.
 
 
भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांना मिळाला आहे. २ एप्रिल १९८४ रोजी भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या ‘सोयूझ टी-२’ यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत राकेश शर्मा यांनी अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.
 
 
राकेश शर्मा यांचा जन्म पतीयालात झाला असून ते भारतीय वायू दलात वैमानिक म्हणून काम करीत होते. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारने अशोक चक्र देवून देखील सन्मानित केले. अंतराळ क्षेत्रात त्यांनी भारतीयांसाठी नवे दालन उघडे करून दिले तसेच भारताचे नाव त्याकाळी त्यांनी जागतिक पातळीवर झळकाविले. 
@@AUTHORINFO_V1@@