आज भारत वि. दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
सेंच्युरीयन: आज दक्षिण आफिकेतील सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरीयन येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेबरोबरचा दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात अपयश मिळाल्यावर आता भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने अतिशय मेहनत घेतली असून आज ती मेहनत दिसणार आहे.
 
 
 
 
 
 
पहिल्या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात जोरदार झाली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारतीय फलंदाजांना देखील लवकर तंबूत धाडले असल्याने पहिला सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली २८ धावांवर, हार्दिक पांड्या १ धावेवर तर रोहित शर्मा १० धावांवर बाद झाल्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा खेळ ढासळला.
 
 
यानंतर मुरली विजय १३, शिखर धवन १६ तर चेतेश्वर पुजारा ४ धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचे मनोबल ढासळल्याने भारताला पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रीचे गोलंदाज वरनॉन फिलँडर याने पहिल्या कसोटी सामन्यात सामन्यात ६ गडी बाद केल्याने दक्षिण आफ्रिकेला यश मिळाले. यामुळे भारताचा ७२ धावांनी पराभव झाला होता.
 
 
आता आजच्या सामन्यात भारत आपल्या उरलेल्या धावा भरून काढू शकतो हे काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@