रनाळे पोलीस स्टेशन प्रस्तावाला मंजुरी द्यावी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
 

 
 

ग्रामपंचायततर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन

 
नंदुरबार : रनाळे येथील पोलीस स्टेशनच्या प्रस्तावास मंजुरी मिळावी, अशी मागणी येथील ग्रामपंचायत तर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन पोलीस अधीक्षक संजय पाटील यांना देण्यात आले.
 
 
 
निवेदनात पुढे म्हटले आहे की, रनाळे गाव हे जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. रनाळे परिसरातील ३६ खेडे व कोपर्ली परिसरातील बरेच गावे आहेत. या गावातून राजकीय हालचालींना वेग मिळत असतो. तसेच रात्री पहाटेच्यावेळी चोरीचे व लुटमारीचे प्रकार या भागात होवू शकतात. येथे तीन दिवशीय यात्राही भरत असते. म्हणून संभाव्य धोके पाहता शांतता व सुव्यवस्थेसाठी कोपर्ली आऊटपोस्ट व रनाळे आऊटपोस्ट एकत्र करुन रनाळे गावात पोलीस स्टेशन मंजुर करण्यात यावे. तसा प्रस्ताव १९९७-९८ मध्ये देण्यात आलेला आहे. परंतु अजुनपर्यंत त्या प्रस्तावावर कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही.
 
 
 
या गावाची लोकसंख्या पाहता सद्याचा पोलीस कर्मचारी वर्ग अपूर्ण पडतो. तरी लवकरात लवकर पोलीस स्टेशनचा प्रस्ताव मंजुर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसे निवेदन ग्रामपंचायतर्फे दिपक गवते यांनी पोलीस अधीक्षक संजय पाटील यांना दिले आहे. निवेदनावर सरपंच सौ.तृष्णा प्रदीप गवते तसेच ग्रामविकास अधिकारी बी.ए.पाटील यांच्या सह्या आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@