मराठी विश्वकोश मोबाइल ऍपचे लोकार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
वाई : मराठी विश्वकोश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक लोकाभिमुख व्हावे यासाठी मराठी विश्वकोशाचे ऍप बुकगंगा तर्फे बनवले गेले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, बुकगंगा डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मंदार जोगळेकर, मंडळाच्या सचिव श्रीमती सुवर्णा पवार, सहा. सचिव डॉ. जगतानंद भटकर आदी मान्यवरांच्या हस्ते या ऍपचे लोकर्पण करण्यात आले.
 
 
 
आता अवघ्या एका क्लिकवर मराठी विश्वकोशातील विश्वासार्ह आणि अधिकृत माहिती जगभरातील मराठी वाचकांना सहज उपलब्ध होईल. विशेष म्हणजे बुकगंगाचे मंदार जोगळेकर यांनी सामाजिक दायित्व म्हणून हे मोबाइल ऍप विनामूल्य तयार करून दिले आहे. आणि वाचकांनाही गुगल प्ले स्टोअरवरून हे ऍप विनामूल्य डाउनलोड करता येईल. मराठी विश्वकोशाचे सर्व १ ते २० खंड, त्यांतील सुमारे १५१ विषय आणि १९००० नोंदी इतका प्रचंड ज्ञानाचा खजिना घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाचकांना भेटणारा हा मराठी विश्वकोश म्हणजे भारतीय प्रादेशिक भाषांतील हा पहिलाच यशस्वी उपक्रमआहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@