श्रीनगर येथील रस्त्यावरून स्फोटके जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
श्रीनगर : श्रीनगर येथील एचएमटी रस्त्यावरून आज मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहे. ही स्फोटके सुरक्षा रक्षकांकडून जप्त करण्यात आली आहेत. ‘बॉम्ब शोधक पथका’ने आज ही छुपी स्फोटके शोधली असून त्यांनी याची माहिती सुरक्षा रक्षकांना दिली. सध्या अवंता भवनाला घेराव घातला असून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी भारतीय सुरक्षा रक्षकांवर सतत गोळीबार करीत आहेत. मात्र या हल्ल्यांचे चोख प्रतिउत्तर भारतीय सुरक्षा रक्षक देखील देत आहे. म्हणून एकाच वेळी अनेक जवानांना मारण्यासाठी दहशतवाद्यांनी ही स्फोटके लावली असल्याचा अंदाज सध्या पोलिसांकडून लावल्या जात आहे.
 
 
 
सध्या या भागात शोध मोहीम जोरात सुरु आहे. अजून काही ठिकाणी स्फोटके असल्याची शंका असल्याने ‘बॉम्ब शोधक पथक’ या भागात शोध मोहीम सुरु ठेवीत आहेत.
 
छत्तीसगड येथील भागात देखील नक्षलवाद्यांकडून अशी काही स्फोटके रस्त्यांवर लावली जातात. यामुळे रस्ते नष्ट होतात तसेच पोलीस आणि सुरक्षा रक्षक मारले जावे हा त्यामागील दहशतवादी आणी नक्षलवाद्यांचा कट असतो.
 
 
@@AUTHORINFO_V1@@