राजकोटमध्ये अग्नीतांडव, ३ बालकांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
राजकोट: गुजरातमधील राजकोट येथे काल स्वामी धर्मबंधू शिबिरात भीषण अग्नीतांडव घडले. काल रात्री १० च्या सुमारास ही आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. या आगीत तीन मुलांचा मृत्यू झाला असून यात १५ बालके जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. जखमी मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
 
काल रात्री मुल जेवण करीत असतांना अचानक शिबिराच्या पडद्यावर आग लागली, त्यातूनच ही आग हळूहळू पसरली आणि संपूर्ण शिबिरातील पडद्यावर या आगीने कब्जा केला. यामुळे संपूर्ण शिबिरातील मुलांची एकच धांदल उडाली. शिबिरातील सुरक्षा रक्षकांनी तातडीने मुलांना बाहेर काढले मात्र यात ३ मुलांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. 
 
 
त्याच वेळी अग्निशमन दल देखील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्याच वेळी आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात आली मात्र शिबिरातील वस्तूंचे खूप नुकसान झाले असल्याची माहिती सध्या मिळत आहे. ३०० ते ४०० मुलांना यावेळी घटनास्थळावरून हलवण्यात आले. या आगीत ८० राहण्यासाठी करण्यात आलेले ‘टेंट’ जळून खाक झाले आहेत.
 
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे म्हटले जात आहे. जखमी मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरवर्षी देशातील विविध ठिकाणी मुलांसाठी हे शिबीर आयोजित केले जाते. देशभरातून अनेक मुल या स्वामी धर्मबंधू शिबिरासाठी येत असतात. 
@@AUTHORINFO_V1@@