लाच प्रकरणात कार्ती चिदंबरम यांच्या घरी छापे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
 
दिल्ली: माजी अर्थ मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी.व्ही. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नई येथील घरावर आज सक्तवसुली संचालनालय अर्थात ‘ईडी’कडून छापे मारण्यात आले आहे. लाच प्रकरणात अडकलेले कार्ती चिदंबरम यांच्या बऱ्याच घरांवर आज ‘ईडी’कडून छापे मारण्यात आले आहे.
 
‘ईडी’कडून २०१७ मध्ये कार्ती चिदंबरम यांच्या विरुद्ध लाच घेण्याच्या प्रकरणावरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. सक्तवसुली संचालयालयाने कार्ती चिदंबरम यांची १.१६ कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली होती. कार्ती यांच्यावर एअरसेल मॅक्सिस घोटाळ्याचा आरोप असल्याने ‘ईडी’ने त्यांची सर्व बँक खाती देखील जप्त केली होती.
 
त्यामुळे तेव्हापासूनच कार्ती यांच्यावर ‘ईडी’ची कडक नजर असल्याने आज पुन्हा त्यांच्या दिल्ली आणि चेन्नई येथील घरांवर ‘ईडी’ने छापे मारले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना सीबीआयसमोर हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच त्याच्याविरोधात तपास सुरू असून परदेशात त्यांच्या संपत्तीचा तपास केला जात आहे.
 
ब्रिटेनमधील अघोषित संपत्तीबाबत आयकर विभागाला माहिती द्यावी अशी नोटीस आयकर विभागाकडून त्यांना बजावण्यात आली होती. तसेच त्यांच्या विरोधात सीबीआयने लुकआउट नोटीस देखील जारी केली होती.
 
 
@@AUTHORINFO_V1@@