महाराष्ट्र प्रदेश हज कमिटीचा ड्रॉ जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
 
 

हज यात्रेसाठी जिल्ह्यातून
 
९० भाविकांची निवड

 
नंदुरबार : इस्लाम धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या हज यात्रेला लाखो भाविक जगभरातून मक्का येथे जात असतात. त्यासाठी लाखो लाखो अर्ज हज यात्रे कमिटीला प्राप्त होतात. यातून ड्रॉ काढून भाविकांची हत्र यात्रेसाठी निवड केली जाते. यावेळी जिल्ह्यातून ६०० भाविकांनी आपले अर्ज भरले होते. महाराष्ट्र प्रदेश हज कमिटीच्या ड्रॉ जाहीर झाला असून त्यात जिल्ह्यातून ९० भाविकांची हज यात्रेसाठी निवड झाली आहे. त्यांना तसे कळविण्यात आले असल्याची माहिती हज कमिटीचे जिल्हा समन्वयक आरिफ हाफीज यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, वेळोवेळी हज कमिटीकडून जिल्ह्यासाठी कोटा वाढवून मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. दरवर्षी यात्रेसाठी जाणार्‍या भाविकांची संख्या जास्त असल्याने ही मागणी पूर्ण होवू शकत नाही. निवड झालेल्या भाविकांनी हज कमिटीशी संपर्क साधावा.
@@AUTHORINFO_V1@@