२ रा कसोटी सामना, दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
सेंच्युरीयन: आज दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु झाला असून भारताने बऱ्याच वेळेनंतर दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला आहे. २९ व्या शतकावर भारताने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या गडीला बाद केले आहे. आजच्या सामन्याला सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरीयन येथे सुरुवात झाली असून आज दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
 
त्यानुसार प्रथम दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज मैदानात उतरले आहेत. सध्या मैदानावर हाशिम अमला १४ धावांवर तर अॅडेन मार्क्रम ७८ धावांवर खेळत आहे. आज देखील दक्षिण आफ्रिकेची सुरुवात जोरदार झाली असून सध्या दक्षिण आफ्रिका १३० धावांवर १ बाद अशा स्थितीमध्ये खेळत आहे. डीन एल्गर याला पहिल्यांदाच ३१ धावांवर बाद करून तंबूत पाठवण्यात आले आहे.
 
 
 
 
पहिल्या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात जोरदार झाली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारतीय फलंदाजांना देखील लवकर तंबूत धाडले असल्याने पहिला सामना भारताच्या हातातून गेला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली २८ धावांवर, हार्दिक पांड्या १ धावेवर तर रोहित शर्मा १० धावांवर बाद झाल्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा खेळ ढासळला.
 
 
 
 
यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ७२ धावांनी पराभव झाला होता. आता आजच्या सामन्यात भारत आपल्या उरलेल्या धावा भरून काढू शकतो हे काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@