'दहशतवाद आणि मैत्रीपूर्ण संबंध एकत्र नाही' - रविश कुमार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018
Total Views |



नवी दिल्ली : पाकिस्तानच्या दहशतवादी भुमिकेवरून भारतने पुन्हा एकदा पाकिस्तानला खडेबोल सुनावले असून दहशतवाद आणि मैत्री या दोन्ही गोष्टी एकत्रपणे होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रया भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली आहे. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या आगामी भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यामुळे पाकिस्तानने अगोदर दहशतवादी कृत्य बंद करावीत आणि त्यानंतरच चर्चसाठी यावे, असे देखील कुमार यांनी पाकिस्तानला खडसावले. 
 
 
पाकिस्तान एकीकडे काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणत आहे आणि दुसरीकडे भारताला विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रण देत आहे. परंतु पाकिस्तान स्वतः जोपर्यंत आपली दहशतवाद पूरक भूमिका सोडत नाही, तोपर्यंत आम्ही त्याच्या बरोबर चर्चा करू शकत नाही' असे कुमार यांनी म्हटले आहे. याच बरोबर पाकिस्तानकडून नुकताच कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता, त्यावरून पाकिस्तानवर टीका करत, पाकिस्तान अशा गोष्टी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांचे सांत्वन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता सर्व देशांना पाकिस्तानचा खरा चेहरा समजाला आहे, असे ते म्हणाले.

यानंतर इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा आगामी भारत दौऱ्याविषयी त्यांनी माहिती दिली. भारत आणि इस्राइल यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांना यंदा २५ वर्ष पूर्ण झाल्याचे सांगत, त्याच पार्श्वभूमीवर नेतन्याहू हे भारत भेटीवर येणार आहेत, असे ते म्हणाले. तसेच ही भेट दोन्ही देशांसाठी महत्त्वाची असून या भेटीदरम्यान नुकताक आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित झालेल्या जेरुसलेमच्या मुद्द्यावर देखील दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल, असे ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@