भारतीय महासत्तेचा आधारस्तंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018
Total Views |
 
 
प्रा.जयश्री महाजन
 
आजच्या युवक-युवतींमध्ये निश्‍चितच बदल घडून आला आहे. परंतु तो आशावादी की निराशावादी? हे मोठे प्रश्‍नचिन्ह आहे.
एकीकडे परंपरागत दृष्टिकोनात महत्त्वपूर्ण बदल घडून आले आहेत. युवक-युवती समानतेने वावरताना दिसतात. एवढेच नव्हे तर, काही बाबतीत युवती युवकांपेक्षा सरस ठरतात. दुसरीकडे युवकांची पुरुषप्रधान मानसिकता बदल हा स्वीकारताना दिसत नाही.
शहरी युवकाच्या तुलनेत ग्रामीण भागातील युवकाची स्थिती आजही दारुण आहे. नशाच्या आणि निराशेच्या भोवर्‍यात तो सापडलाय.
एकीकडे इंटरनेट, मोबाईलसारखे तंत्रज्ञान त्याला समृध्द बनवतेय तर दुसरीकडे हेच तंत्रज्ञान त्याला माणसांपासून, समाजापासून तोडतेय. विकासाकडे धावणार्‍या या युवकाला समाजाचे निती-नियम, मूल्यव्यवस्था बंधने वाटतात. हे पाहता आजच्या युवकाला तंत्रज्ञानाशी सुसंगत मूल्यव्यवस्था रुजवायला हवी. कारण हा बदलता युवकच भारतीय महासत्तेचा आधारस्तंभ आहे.
 
 
 
भारताची ‘तरुण’ लोकसंख्या तुलनेत अधिक आहे. म्हणजेच, मानवी बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता यांची देणगी आपल्याकडे आहे. उत्तरोत्तर तंत्रज्ञानात होणारी प्रगती युवकांसाठी एक संधी आहे आणि बहुतांश युवक-युवती त्याचा फायदाही घेत आहेत.
देशातील या युवक-युवतींनी बलदते तंत्रज्ञान स्वीकारले आहे. त्याच्या दृष्टिकोनात, विचारात त्याचा प्रभावही दिसतोय.

 
युवक बदलायला हवा, परंतु या बदलाला मानवतेची, सामाजिकतेची झालर ही निश्‍चित हवी. केवळ वैज्ञानिक, तंत्रज्ञानात्मक जीवनशैली जोडली जाणे गरजेचे आहे. युवक-युवतींनी त्यांना मिळालेल्या संधीचा लक्षणीय फायदा घेतलेला दिसतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आज युवती आपला सहभाग नोंदविलेला आहे. असे सक्षम युवक-युवती मानवतेची व समानतेची कास धरुन पुढे जातील तर निश्‍चितच भारताला भावी महासत्ता होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, हे निश्‍चित...
 
@@AUTHORINFO_V1@@