एनसीजी गटात भारताच्या प्रवेशासाठी अमेरिकेकडून पूर्ण प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018
Total Views |

अमेरिकेचे राजदूत केनेथ जस्टर यांचे प्रतिपादन 




नवी दिल्ली : 'अणु पुरवठा गट अर्थात एनसीजीमध्ये भारताच्या प्रवेशाला अमेरिकेचा पूर्ण पाठींबा असून यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न अमेरिकेकडून केले जात आहेत.' असे प्रतिपादन अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत केनेथ जस्टर यांनी केले आहे. नवी दिल्ली येथे त्यांच्या नियुक्तीनंतर झालेल्या आपल्या पहिल्याच भाषणात ते बोलत होते.

प्रशांत आणि हिंद महासागराच्या संपूर्ण परिसरामध्ये भारत ही एक मोठी शक्ती म्हणून ओळखला जातो. याच बरोबर भारत हा एक जबाबदार देश असून आशिया खंडामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची देखील त्याला जाण आहे. त्यामुळे एनसीजी गटाचा भारत एक जबाबदार सदस्य होऊ शकतो, याची आम्हाला पूर्ण खात्री असून भारताला एनसीजी गटात प्रवेश मिळावा. यासाठी अमेरिका सर्व प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.

पाकिस्तानच्या भूमिका दुटप्पी
दशशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर टीका करत, पाकिस्तान हा नेहमीच दहशतवादाच्या बाबतीत दुटप्पी भूमिका घेतला आला आहे. अमेरिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा त्याने दहशतवादासाठी सातत्याने वापर केला आहे. त्यामुळे अमेरिकेने त्याची आर्थिक मदत बंद केली आहे. तसेच पाकिस्तानने आपली दहशतवादासंबंधी असलेली दुटप्पी भूमिका सोडल्यानंतरच अमेरिका, अफगाणिस्तान आणि भारताशी त्याचे संबंध सुधारण्याची शक्यता आहे.


चीनमधील अमेरिकन कंपन्या भारतात करतील गुंतवणूक 
भारत आणि अमेरिका यांच्यातील विविध संबंधांवर भाष्य करत, भविष्यात चीनमध्ये असलेल्या अमेरिकन लवकरच भारतामध्ये आपली गुंतवणूक करण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. चीनमध्ये सध्या अमेरिकन कंपन्यावर लाधाण्यात येत असलेले निर्बंध आणि तेथील एकूणच परिस्थिती पाहता, या कंपन्या भारताला अधिक पसंती देतील, अशी शक्यता देखील त्यांनी यावेळी वर्तवली.
@@AUTHORINFO_V1@@