जिल्ह्यात ‘पर्यटक ग्राम’ संकल्पना राबविणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018
Total Views |

जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांचे प्रतिपादन

 
 
पालघर : पालघर जिल्ह्यात सागरी, डोंगराळ भागातील तसेच पूराणकाळातील वास्तू असल्याने पर्यटन विकासाला खूप संधी उपलब्ध आहे. या जिल्ह्यातील आदिवासी परंपरांचे जतन करण्यासाठी वनवासी समाजाचे सण मोठ्या प्रमाणात साजरा करणे तसेच सर्व बाबींनी पर्यटकांसाठी परिपूर्ण असणार्‍रा ‘पर्यटक ग्राम’ची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रतिपादन केले.
 
आगामी वर्षामध्ये जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान माहिती दिली. शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी गट शेतीला प्रोत्साहन देण्यात येत असून नारळ, चिकू, मोगरा, तांदूळ व भाजीपाला विभागात गट तयार करून त्यांच्या कंपन्या स्थापन करण्याची क्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
 
जिल्ह्यामध्ये अवैध पद्धतीने रेती उत्खनन ही गंभीर समस्या झाली असून या व्यवसायांतील गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. गैरप्रकारे रेती उत्खनन करणाऱ्या विरोधात सागरी भागामधून कारवाई करण्यास प्रशासनाला मर्यादा येत असल्याची कबूली देत याकामी मेरेटाईम बोर्डाची मदत घेत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. रेती माफीयाच्या विरोधातील कारवाईमध्ये जिल्हा प्रशासनाने जप्त केलेल्या १४-१५ बोटीपैंकी ४-५ बोटी चोरीस गेल्याची त्यांनी माहिती दिली. वैतरणा पुलाखालून नौकायान वाहतूक बंद करण्यासाठी लोखंडी अडथळे लावण्यासाठी रेल्वे व्यवस्थापनाकडून टेंडर प्रक्रिया राबवित असून या दोन्ही पुलाच्या लगत नौकायान बंद करण्याची काटेकोर अमलबंजावणी लवकरच होईल, असा विश्‍वासदेखील त्यांनी दिला.
 
रेतीच्या गैररित्या होणार्‍रा उत्खननावर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त समितीची स्थापना करण्यात येऊन या समितीमार्फत ५-१० वेळा सातत्याने कारवाई करण्यात येणार असून महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून काही निर्देश मिळाल्यानंतर कारवाईची धार वाढणार आहे. व पुढील दोन तीन महिन्यात रेती माफियांची कंबर मोडून काढू, असा विश्‍वास जिल्ह्याधिकारी यांनी व्यक्त केला.
 
जिल्ह्यातील सूर्या व लेंढी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवून त्यांना जमिनीचा मोबदला देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे टॅप्स प्रकल्प ३ व ४ च्या प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुर्नवसन करण्यासाठी १८० कोटी रूपयांचा आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याचप्रकारे कोयना धरण प्रकल्पातील सातारा जिल्ह्यातील काही प्रकल्पग्रस्तांना पालघर जिल्ह्यात स्थलांतर करण्याबाबत येणाऱ्या वर्षात हालचाली होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
 
जिल्ह्यातील नियोजन समिती मार्फत आखल्या गेलेल्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून ही सर्व कामे मार्च महिन्यापूर्वी पूर्ण होतील. तसेच नियोजन समितीचा निधी शासनाकडे परत जाणार नाही, असा विश्‍वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला.
 
पालघर नवनगरच्या बांधकामाच्या दृष्टीने खोदकामाचे काम सुरू असून प्रत्यक्षात बांधकाम सुरू करण्यासाठी रेडी मिक्स प्लान्ट उभारणे, इतर बांधकाम साहित्य बांधकामस्थळी हलविण्याचे (मोबिलायझेशन) करण्याचे काम सुरू आहे. पालघरचे नवीन जिल्हा परिषद व जिल्ह्याधिकारी कार्यालय दि. २० फेब्रुवारी २०१९ पूर्वी व बांधून कार्यरत करण्याचे उद्दिष्ट सिडको पुढे ठेवण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@