डोंबिवलीत भाजपाच्या आधारकार्ड शिबिराला उदंड प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018
Total Views |

 
 
 
डोंबिवली : आधारकार्डासाठी ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यातच शहरातील दोन बँकांव्यतिरीक्त कुठेही आधारकार्ड केंद्र नाही त्याची दखल घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेनूसार पंडीत दीनदयाळ उपाध्याय कल्याणकारी संस्था व भारतीय जनता पक्ष डोंबिवली पश्चिममंडल यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आधार कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन दि. १० ते १२ जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीत सुरु झाले. त्याचा शुभारंभ बुधवारी राज्यमंत्री चव्हाण यांनी केला.
 
सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत एव्हरेस्ट हॉल, म. गांधी मार्ग डोंबिवली पश्चिम येथे ही सुविधा उपलब्ध असणार असल्याची माहिती शिबिराचे आयोजक भाजपाचे पश्चिममंडल अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे यांनी दिली. आधार कार्ड नोंदणीसाठी, नवीन नोंदणी/दुरुस्ती असे विविध सुविधा तेथे उपलब्ध असतील. मात्र, त्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांच्या सुविधेसाठी ५ यंत्र ठेवण्यात येणार असून एकाचवेळी १५० नागरिकांची सोय होणार असल्याचे प्रभुघाटे म्हणाले. पूर्व नोंदणीसाठी नागरिकांनी बाळकृष्ण अपार्टमेंट, सी विंग, पहिला मजला, घन:श्याम गुप्ते मार्ग, डोंबिवली (पश्चिम) येथे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@