उद्या पडद्यावर घडणार ‘बारायण’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |


 
निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणार असा दावा करणारा 'बारायण' हा मराठी चित्रपट उद्या (१२ जानेवारी) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स'ची निर्मिती आणि दीपक पाटील यांचे दिग्दर्शन असलेल्या 'बारायण' ची प्रस्तुति शायना एन.सी. यांनी केली आहे. दिग्दर्शक दीपक पाटील यांचा हा पहिला मराठी चित्रपट असून त्यांनी यापूर्वी विविध हिंदी, मराठी दुरचित्रवाहिन्यासाठी प्रोमो हेड म्हणून काम केलेले आहे. 'बारायण' बरोबरच 'हॉस्टेल डेज' आणि 'डॉ. तात्या लहाने' हे दोन मोठे मराठी चित्रपटही उद्या प्रदर्शित होत आहे. तर दुसरीकडे हिंदी मध्येही 'कालाकंदी', '१९२१' व 'मुक्काबाझ' हे तीन चित्रपट मनोरंजन करण्यास सज्ज आहेत.
 
 
 
'बारायण' चित्रपटात अभिनेता अनुराग वरळीकर मुख्य भूमिकेत आहे. तर बाबांच्या भूमिकेत अभिनेते नंदू माधव, आईच्या भूमिकेत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, आत्याच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते दिसणार आहेत. याशिवाय अभिनेते संजय मोने, ओम भुतकर, रोहन गुजर, उदय सबनीस, प्रसाद पंडित, समीर चौगुले, श्रीकांत यादव, कुशल बद्रिके, प्रभाकर मोरे तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निपुण धर्माधिकारी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अतिशय हटके पध्दतीने मनोरंजन करणाऱ्या ‘बारायण’ ची कथा, दिग्दर्शक दिपक पाटील यांची असून पटकथा –संवाद निलेश उपाध्ये यांचे आहेत. सिनेमाचे छायाचित्रण मर्ज़ी पगडीवाला यांनी केले आहे. गीतकार वलय, गुरु ठाकूर, क्षितिज पटवर्धन यांच्या गीतांना संगीतकार पंकज पडघन यांचे संगीत लाभले आहे. तर आशिष झा यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे.
 
 
'बारायण' चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक व निर्मात्या यांची मुलाखत वरील व्हिडिओ मधून तुम्ही पाहू शकता.
 
'हॉस्टेल डेज' हा चित्रपट अजय नाईक यांनी दिग्दर्शित केला असून यामध्ये आरोह वेल्हाणकर, प्रार्थना बेहरे, अक्षय टांकसाळे, संजय पवार या कलाकारांनी प्रमुख भूमिका केली आहे. तर 'डॉ. तात्या लहाने' या चित्रपटातून तात्यांचे अतुलनीय कार्य दाखविण्यात आले आहे. यात मकरंद अनासपुरे व अलका कुबल मुख्य भूमिकेत आहेत.
 
 
 
 
हिंदीत अनुराग कश्यप याने दिग्दर्शित केलेला 'मुक्काबाझ' हा चित्रपट प्रदर्शित होतो. यात विनीत कुमार सिंग व जिमी शेरगील रसिकांचे मनोरंजन करणार आहेत. 'कालाकंदी' या चित्रपटातून सैफ अली खान पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांसाठी एका वेगळ्या भूमिकेतून समोर येत आहे. भयपट चाहत्यांसाठी विक्रम भटच्या '१९२१' या चित्रपटाचा देखील एक पर्याय या शुक्रवारी उपलब्ध होणार आहे.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@