पंचायत समितीत सदस्यांना एकत्र घेऊन विकास करावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |

खासदार कपिल पाटील यांची सूचना


 
भिवंडी : पंचायत समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांना एकत्र घेऊन भिवंडी तालुक्याचा विकास करावा. प्रत्येक गावात कामे करताना कोणताही पक्षभेद ठेवू नका, अशी सूचना भाजपचे खासदार व ठाणे विभागीय अध्यक्ष कपिल पाटील यांनी बुधवारी येथे केली.
 
पंचायत समितीतील भाजप व श्रमजीवी संघटना आघाडीच्या नवनिर्वाचित सभापती रवीना रवींद्र जाधव यांनी आज पदाची सूत्रे स्वीकारली. त्यावेळी खासदार पाटील बोलत होते. यावेळी भाजपचे आमदार महेश चौघुले, तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे यांच्यासह भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
 
भिवंडी पंचायत समितीत भाजप व शिवसेनेत रस्सीखेच असतानाच, भाजप-श्रमजीवी संघटना आघाडीने यश मिळविले. त्यामुळे पंचायत समितीच्या कामकाजात संघर्ष होण्याची शक्यता आहे. मात्र, खासदार कपिल पाटील यांनी पक्षभेद बाजूला ठेवून विकास करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे राजकीय पक्षातील संघर्ष मिटविण्यावर खासदार कपिल पाटील यांनी भर दिला असल्याचे मानले जाते.
 
प्रत्येक पंचायत समिती सदस्याने आपल्या गणातील समस्यांची माहिती घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना कपिल पाटील यांनी केली. कपिल पाटील यांच्या सूचनेनुसार तालुक्याचा विकास करणार असल्याची ग्वाही रवीना जाधव यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@